सारा अली खान बॉलिवूडमधील सर्वात फिटेस्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. परंतु सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी सारा आजच्या इतकी फिट नव्हती. किंबहूना त्यावेळी तिचं वजन ९६ किलो इतकं प्रचंड होतं. मात्र नियमीत व्यायाम व योग्य आहार घेऊन साराने वजन कमी केलं. परंतु वजन कमी करणं देखील आता तिला काहीसं त्रासदायक ठरत आहे. ।
.सारा अलिकडेच तिच्या 'लव्ह आज कल' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमेरिकेला गेली होती. त्यावेळी विमातळावरच तिला थांबवलं गेलं. कारण तिच्या पासपोर्टवर तिचा स्थूल असतानाचा फोटो आहे. या फोटोमुळे विमानतळावरील अधिकाऱ्यांना तिला ओळखताच येत नव्हते.
सारा दुसऱ्याच कुठल्यातरी मुलीच्या पासपोर्टवर प्रवास करत असल्याचा त्यांचा समज झाला. मात्र अखेर तिची कसून चौकशी झाल्यावर ती साराच आहे हे सिद्ध झाले. हा किस्सा साराने इस्ट इंडिया कंपनी या शोमध्ये सांगितला. 'लव्ह आज कल' या चित्रपटाला भारतात मिश्र प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या तीन दिवसांत चित्रपटाने जवळपास २५ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटात सारा अली खान व कार्तिक आर्यन यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. २००९ साली प्रदर्शित झालेल्या 'लव्ह आज कल' या चित्रपटाचा हा प्रिक्वल आहे. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या त्या चित्रपटात सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती.