अपघात मुक्त शहर भावी पिढीने घडवावे - राजेश गाडगे

मुंबई, दि.१७ (प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व शारीरिक शिक्षण उपविभाग तसेच मुंबई पोलिस शिक्षण वाहतुक विभागाच्या वतीने द्वितीय रस्ता सुरक्षा दल शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ११६ मुलगे व १२० मूली असे एकूण २३६ प्रशिक्षणार्थी शिबीरात सहभागी झाले होते. आर. एस. पी शिबीराच्या समारोप प्रसंगी पाहुणे म्हणून पोलिस उपनिरीक्षक बी. एस. पवार (प्रशिक्षण विभाग), निलेश फातर्फकर ( शिक्षण विभाग), मनपा पर्यवेक्षक राजेश गाडगे, शिबीर प्रमुख रवींद्र परदेशी, कनिष्ठ पर्यवेक्षक धैर्यधर पाटील, दत्तु लवटे, सत्यशिला कांबळे तसेच पोलिस हवालदार विनोद विचारे हे उपस्थित होते. मनपा पर्यवेक्षक राजेश गाडगे यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अपघात मुक्त शहर, देश भावी पिढीने घडवावा. पोलिस हवालदार विनोद विचारे यांनी रस्ता सुरक्षा दलाबाबत सविस्तर माहिती दिली.



त्यांनी सांगितले की, सन १९४८ मध्ये मुंबईत रस्ता सुरक्षा सापडलेला अल्ताफ दलाची सुरुवात झाली. सन १९५१ पासून शाळांमधुन रस्ता सुरक्षा विषय शिकविण्यास सुरुवात झाली. सध्या मुंबई महापालिकेच्या ३१८ शाळा व इतर खाजगी शाळा अशा एकूण ६८४ शाळांमध्ये विद्यार्थी- विद्यार्थिनी रस्ता सुरक्षेचे धडे गिरवत आहेत. मुलांमध्ये एकात्मता, बंधुभाव, कर्तव्य व धैर्य या गोष्टींचे नगर परिसर येते. महत्त्व पटवून देण्यासाठी रस्ता सुरक्षा दल शिबीर आयोजनाची संकल्पना तयार झाली. रस्ता सरना. नियमन. मॅन्यअल सिग्नलची माहिती देण्यात येते. स्पर्धात्मक भावना तयार होण्यासाठी संचलनही शिकवतात. रस्ता सरमा माटा अधिकार, माझी जबाबदारी' हे धैर्य शिबीर यशस्वी होण्यासाठी कनिष्ठ पर्यवेक्षक सुरेश भोसले, जयंत निशाणे, रेणू निशाणे, रघुनाथ सोनवणे तसेच पोलिस हवालदार प्रशांत तोडणकर, पोलिस नाईक सचिन चव्हाण, पोलिस नाईक कालीदास तांबोळी, विजय चव्हाण व पोलिस शिपाई गजानन सांगोरे व संजय दिघे यांनी मेहनत घेतली.